यशोदा घाणेकर - लेख सूची

आरोग्यासाठी कृत्रिमप्रज्ञा

डोळे, कान, नाक, जीभ, आणि त्वचा या मुख्य ज्ञानेंद्रियांमधून आपण आजूबाजूच्या जगाची माहिती घेतो, मेंदूमध्ये त्या माहितीचा अर्थ लावतो, आणि आपल्या दृष्टीने योग्य तो प्रतिसाद देतो. योग्य प्रतिसाद काय हे आपण स्वतः, आपले कुटुंबीय, आणि समाजाच्या सामुदायिक अनुभवांमधून शिकतो. विषयामधील गुंतागुंत जसजशी वाढत जाते, तसे ते शिकण्यासाठी लागणारा वेळ वाढत जातो. लहानपणी अक्षरे शिकून आपले …

मेंदूचे अपहरण : निसर्गातील प्रभावी शस्त्र

उंदीर न घाबरता मांजरीकडे जाताना दिसला किंवा एखाद्या किड्याने पाण्यात उडी मारून जीव दिला तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपल्याला भास होतो आहे का असेही वाटू शकेल. पण निसर्गात सुरस आणि चमत्कारिक वाटणाऱ्या घटना घडत असतात, त्यात या आणि अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी खरोखरच घडतात. त्यांचा अभ्यास केला की दिसून येते की हीपण एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग …

उत्क्रांती

‘आपण पृथ्वीवरचे सर्वात प्रगत आणि यशस्वी प्राणी आहोत’ असा माणसाचा समज असतो. निसर्गतः ज्या क्षमता माणसात नाहीत, त्या त्याने यंत्रे बनवून मिळवलेल्या आहेत. माणूस विमान बनवून उडू शकतो किंवा दुर्बिणीतून दूरवरचे बघू शकतो. त्यामुळे माणूस प्रगत आहे असे म्हणता येईल. पण प्रगत असला म्हणून माणूस पृथ्वीवरील सर्वात यशस्वी प्राणी ठरतो का? उत्क्रांतीमध्ये (evolution) जो जीव …

COVID-19 विषयी

साधारण नोव्हेंबर २०१९ पासून मार्च २०२० पर्यंत म्हणजे फक्त साडेचार-पाच महिन्यांत संपूर्ण जगामधील मानवी आयुष्य एका छोट्याशा विषाणूने विस्कळीत केले आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या साधारण हजारपट लहान, इतक्या छोट्या असलेल्या या विषाणूमुळे आपले रोजचे सामाजिक, आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. आज मार्च २०२० महिन्याच्या शेवटी संपूर्ण जग फक्त या विषाणूची लागण कशी थांबवता येईल आणि …

नैसर्गिक आणि अनैसर्गिक

नैसर्गिक आणि रसायनमुक्त (chemical-free) म्हणजे चांगले असा एक सर्वसाधारण समज आहे. या शब्दांचा अर्थ काय याचा विचार मात्र क्वचितच केला जातो. साधारणतः कारखान्यात बनलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिकपणे अस्तित्वात असलेले साहित्य वापरून बनवलेले खाद्यपदार्थ/ जिन्नस म्हणजे नैसर्गिक किंवा रसायनमुक्त आणि म्हणून हेच चांगले असे मानले जाते. खरे तर दहावीपर्यंत शाळा शिकलेल्या कोणालाही हे लक्षात यावे की …

यंदाचे जीवशास्त्रातील नोबेल पारितोषिक

इसवी सन दोनहजार बाराचे शरीरक्रियाशास्त्रीय वैद्यकशास्त्र या विषयातले नोबेल पारितोषिक ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ सर जॉन गर्डन आणि जपानी जीवशास्त्रज्ञ शिन्या यामानाका ह्या दोघांना प्रौढ पेशीपासून बहुशक्तिक पेशी बनवण्यासाठी देण्यात आले. ह्यातील प्रौढ पेशी आणि बहुशक्तिक पेशी म्हणजे काय आणि एका प्रकारच्या पेशीचे रूपांतर दुसरीत कशासाठी करायचे हे समजून घेण्यासाठी हा लेख. आपल्या शरीरात साधारण चारशे प्रकारच्या …